उद्या मध्य हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं रेल्वेनं घोषित केलंय. माटूंगा- मुंलूंड आणि कुर्ला वाशी दरम्यान तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान ब्लॉक काळातील कामं करण्याचा निर्णय घेतलाय. माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी 9.52 ते दुपारी 2.42 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. ब्लॉक कामांमुळे सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत लोकल फेऱ्या सुमारे 15 ते 20 मिनिटे विलंबाने धावतील.
हार्बर रेल्वे वर कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 3.40 दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल. या काळात कुर्ला ते वाशी दरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी पनवेल मार्गावर विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे वर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. परिणामी काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहे.
चर्चगेट ते मरिन लाइन्स स्थानकादरम्यान पादचारी पुलांचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेने 17 आणि 18 ऑगस्टच्या मध्यरात्री चारही मार्गांवर ब्लॉक घोषित केला आहे. मध्यरात्री 1 ते पहाटे 4.30 पर्यंत ब्लॉक काळातील कामे करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.