परत येण्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे खुले

परत येण्यासाठी ‘मातोश्री’चे दरवाजे खुले

युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या मुंबईत ठिकठिकाणी जाऊन शिवसैनिकांना भेटत आहेत. या निष्ठा यात्रेत ते शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. या यात्रेत आदित्य बोलत होते. गद्दार आमदारांना नाही पण, कट्टर शिवसैनिकांसाठी शिवसेनेचे दरवाजे खुले असल्याचे सांगत बंडखोर आमदारांना साद घातली आहे. आमचे मन मोठे आहे. जसा आम्ही त्या वेळी विश्वास ठेवला आहे, तसाच विश्वास आम्ही प्रत्येक शिवसैनिकांवर टाकत असतो. त्यांनी शिवसेनेत येण्याचे आवाहन केल्यानंतर मात्र बंडखोर आमदारांकडून आरोप- प्रत्यारोप करत त्यांनी एकनाथ शिंदे यांनाच तुम्ही मान-सन्माने बोलवावं असं सांगत ते आले तर आम्ही येऊ असही त्यांनी सांगितलं आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, या भेटी लोकांचे प्रेम आणि विश्वास वाढवण्यासाठी आहे. आणि शिवसैनिकांचे प्रेम आणि विश्वास उद्धव ठाकरेंच्य खंबिरपणे आहे. आमच्यावर वैयक्तिक राग असेल, पण तो राग मुंबईकरांनर काढू नका, मुंबईविरोधी सरकार बनवू नका. बंडखोर आमदारांना साद घालताना आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांना परत यायचे आहे त्यांच्यासाठी दरवाजे खुले आहेत. आणि नेहमीत असणार आहेत. पण, जे मनाने तिकडे गेले असतील त्यांना तिकडे रहायचे असेल त्यांना तिकडे आनंदात रहावे. त्यांच्याबद्दल आमच्या मनात काही नाही. पण दुख: आहे की त्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. बंडखोरी केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्या आमदारांना घाण केली होती असं म्हटलं होतं. त्यामुळे काही आमदार घाण या शब्दावर हटून बसले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version