राज्यभरात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत

राज्यभरात मराठी नववर्षाचं जल्लोषात स्वागत

हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणजे गुढीपाडवा. मंगळवारी गुढीपाडव्यानिमित्त घरोघरी गुढी उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर गुढीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची आपली शतकांची परंपरा आहे. सकाळपासूनच गिरगाव, ठाणे, डोंबिवली, पुणे आणि नागपूर आदी शहरांमध्ये पारंपारिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, मातीतील कसरती यांची ओळख करुन देणाऱ्या शोभायात्रा काढण्यात आल्या आहेत.

सकाळी सकाळीच घरावर गुढ्या उभारून मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. गुडीपाडव्याला मुंबईकर गिरगावमधील शोभायात्रेत जमले. ढोला ताशाच्या गजरामध्ये आकर्षक रांगोळ्यांनी गिरगावमध्ये गुढीपाडवा शुभेच्छा देऊन हा सण साजरा केला जात आहे. दरवर्षी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे गिरगावमध्ये गुढीपाडव्याचं आयोजन केलं जातं.

गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रा सकाळी सकाळी ७ वाजता कोपिनेश्वर मंदिर, तलावपाळी येथून शोभा यात्रा निघाली. या यात्रेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. या यात्रेत पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशा पथक, लेझीमच्या तालावर मिरवणुका काढत तरुणाईने आनंदाला वाट मोकळी करून दिली. त्यामुळे संपूर्ण वातावरण ढवळून निघालं होतं. प्रत्येकजण एकमेकांना अलिंगण देत शुभेच्छा देताना दिसत होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या निवासस्थानी गुढी उभारून गुढी पाडवा साजरा केला. यावेळी फडणवीस हेही नागपूरमधील शोभात यात्रेत सहभागी झाले. यावेळी त्यांनी पारंपारिक पोषाख परिधान केला होता. शोभा यात्रेत नागपूरकरांनी फुगड्यांचा फेर धरला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version