Manoj Jarange Patil : ‘तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसलायं….’, जरांगेंची एकनाथ शिंदेंवर आगपाखड; सरकारला घेतले फैलावर

Manoj Jarange Patil : ‘तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसलायं….’, जरांगेंची एकनाथ शिंदेंवर आगपाखड; सरकारला घेतले फैलावर

अंतरवाली सराटी : कुणबी जातप्रमाणपत्रे अवैध ठरवून ती रद्द करण्यात आल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील प्रचंड संतापले आहेत. त्यांनी आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेत सरकारमधील अनेक नेत्यांना, मंत्र्यांना खरीखोटी सुनावली. विशेष म्हणजे त्यांनी प्रथमच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यांनी अनेक विषयांना हात घालत सरकारला कडक इशारा दिला.

काय म्हणाले जरांगे पाटील

एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला. आता हीच उपकाराची परतफेड आहे का, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला. मराठ्यांनी शिंदेंच्या गद्दारीचा डाग पुसला, त्याच समाजाविरोधात काम करत असल्याचे जरांगे यांनी म्हटले. तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे हेच बरे होते, अशी म्हणायची वेळ आली आहे, असेही त्यांनी नमूद केले. तुम्हाला आम्ही जातीवंत मराठा समजावयचो, पण तुम्ही आता राजकारणामुळे मराठ्याच्या लेकरांविरोधात काम करत असल्याचे आरोप जरांगे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, तुम्ही डबल गेम खेळता का आमच्यासोबत. मतदान आमच पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार आणि मंत्री. शिंदेसाहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलो नाही मी. जीवाची आग होतोय आमची. मला इथे रक्त जाळावं लागतंय आमच्या मराठ्यांच्या लेकरांसाठी. मराठ्यांचं वाटोळं केलं तर तुमचा धुरळा उडवायला मराठ्यांना वेळ लागणार नाही. तुमच्याच ऑफिसला कसं काय भेट देतात. जे स्वतःला स्वयंघोषीत नेते समजतात. जे इकडून तिकडून जमा झाले आहेत. त्या परळीच्या टोळीवाल्यांच्या नादी लागून. तुमच्याच ऑफिसला कसे काय येतात ते. तुमचेच लोकं. शिंदेसाहेब मी हे खूप दिवसांपासून ऐकतोय. आता मी हे ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते जे मराठ्याचे अभ्यासकही आहेत. मराठा समन्वयकही आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोध करणारे ओबीसीचे नेते तुमच्या आहेत. ते तर तुम्हालाही शह देत आहेत. मग तुम्ही सांगितलं का मराठ्यांच्या विरोधात, जरांगेच्या विरोधात आंदोलन करा. ही दोन कारणं सांगितली तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो. तुम्ही जे मराठ्यांच्या समन्वयकाला मराठ्यांविरोधात आंदोलन करायला लावता ना. तेसुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाचे कॉलेज आहे. संभाजीनगरला तिथे बैठका होतात माझ्या विरोधात. तुमच्याच सांगण्यावर होतात एकनाथ शिंदेसाहेब. तुमच्या पक्षाचा नेता, कार्यकर्ता त्याचं कॉलेज आहे, संभाजीनगरला तिथे बैठका होतात. ते सगळेच तुमच्याच पक्षातील लोकं आहेत. कशाला असे विस्तारीता शिंदेसाहेब. ठासून करावं, काय करायचंय ते. मित्र करावा तर ठासून करावं, शत्रू करावं तर ठासून करावं. तुम्ही असे छक्के पंचे खेळाल असं अशी तुमच्याकडून कधीच अपेक्षा नव्हती. आम्ही थोडपण लक्ष दिलं नसतं. तरी तुमची लोकं निवडूनच आली नसती. 

हेही वाचा : Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणात व्हीआयपी ट्रीटमेंटच्या आरोपांवर बीड कारागृह प्रशासनाचा खुलासा; ‘सर्व सुविधा…

<

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version