Mantralay News: मोठी बातमी! मंत्रालयच आता असुरक्षित; मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून मोठी रक्कम लंपास

मंत्र्यांच्या केबिनमधूनच मोठी रक्कम चोरीला गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.  
Mantralay News: मोठी बातमी! मंत्रालयच आता असुरक्षित; मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून मोठी रक्कम लंपास

अतिसुरक्षित मानल्या मंत्रालयातील सुरक्षेवर आता मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या मंत्रालयातच पैसे चोरीला जाण्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंत्र्याच्या केबिनमधूनच मोठी रक्कम चोरीला गेल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.  

मंत्रालयात मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80 हजार रुपये चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मंत्रालयामध्ये दहा हजार रूपयांपेक्षा जास्त रकमेला घेऊन जाण्याची परवानगी नसल्याने संजय राठोड यांच्या कार्यालयात 80 हजार रुपये आलेत कसे याबाबत चर्चांना उधाण आले आहे. 

80 हजार रुपयासाठी कार्यालयातील कर्मचारी आणि कार्यालयात ये जा करणारे इतर विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत झाडाझडती. याबाबतची माहिती बाहेर पडू नये यासाठी अधिकाऱ्यांकडून गयावया करण्यात आल्याची माहितीदेखील समोर आली आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version