जालना : मागेल त्या मराठ्याला आरक्षण द्या आणि सगेसोयरेंना आरक्षण देण्यासाठी कायदा करा; अशा मागण्या मनोज जरांगे यांनी राज्य शासनाकडे केल्या आहेत. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशीही मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे. सरसकट आरक्षण द्यावे, या मागणीवर कायम असल्याचा पुनरुच्चार जरांगेंनी केला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आंदोलन केल्यामुळे चर्चेत आलेल्या जरांगेंच्या नव्या मागणीबाबत राज्य शासनाची प्रतिक्रिया आलेली नाही.
प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू
राज्य शासनाने ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडत आहे त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही प्रक्रिया मागील काही महिन्यांपासून सुरू असून ती थांबवलेली नाही; अशी माहिती राज्य शासनाने दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.