Maratha Reservation Andolan : दिल्लीनंतर आता महाराष्ट्र…; फडणवीस सरकारचं टेन्शन वाढणार? मराठे एकवटले; जरांगेंची मोठी घोषणा

Maratha Reservation Andolan : दिल्लीनंतर आता महाराष्ट्र…; फडणवीस सरकारचं टेन्शन वाढणार? मराठे एकवटले; जरांगेंची मोठी घोषणा

छत्रपती संभाजीनगर : नुकतेच सीजेपीच्या नेतृत्वाखाली दिल्लीसह देशभरात विद्यार्थ्यांचे आंदोलन पार पडले. या आंदोलनाने सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फोडला. सोबतच एका केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामाही देण्यास भाग पाडले. मात्र आता पुन्हा एकदा सरकारची कोंडी करण्यास महाराष्ट्रातील मराठा संघटना सज्ज झाली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावलीमध्ये मोठा एल्गार दिला असून येत्या 29 ऑगस्ट रोजी महामोर्चाची घोषणा केली आहे. 

हेही वाचा : Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अडचणी, कृषिमंत्र्यांनी राष्ट्रीयकृत बँकांना सुनावले खडेबोल; कर्जमुक्तीबाबत काय म्हणाले दत्तात्रय भरणे?

आज, बुधवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठ्यांना वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. कधी काळी समाज एकवटला त्यामुळे आपल्याला काळजीपूर्वक पुढे जायचे आहे. 29 ऑगस्टला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. आपल्याला जर कोणी येड्यात काढत असेल त्यामुळे तुम्हाला बोलावलं. 29 ऑगस्ट रोजी पुन्हा शेवटचं निर्णायक आंदोलन करणार आहे. त्यांनी थेट पुन्हा शेवटच्या आंदोलनाची घोषणा केली. पुढे त्यांनी नमूद केले की, सरकार 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र देत नाही म्हणून एकदम मोठं निर्णायक आंदोलन करायचे आहे. ज्यांना माहित आहे की, आपल्या नोंदी सापडल्या त्यांनी तात्काळ अर्ज करा. समाजातील लेकरांच हाल होत आहे, गेल्या तीन वर्षांपासून रक्त जळतोय म्हणून समाजाच्या लेकरांसाठी शेवटचा निर्णायक आंदोलन करणार आहे. एकानेही घरी थांबायचं नाही, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेतल्याशिवाय सोडायचं नाही. हैद्राबाद गॅझेटीयर दिलं तर मग् प्रमाणपत्र का दिल नाही. मराठ्यांना टार्गेट कशामुळे करता, आधी तुम्ही स्थानिक चौकशी अहवाल आणला. आता तुकडा पडल्याशिवाय राहणार. हैद्राबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र घेतल्याशिवाय आता थांबणार नाही. 29 ऑगस्टपासून जोपर्यंत आंदोलन चालणार आहे, तो पर्यंत वेळ द्या. सर्वपक्षीय नेत्यांच्या मुलांना आरक्षण लागणार आहे. 28 ऑगस्टपर्यंत हैद्राबाद गॅझेटनुसार प्रमाण पत्र द्या, असा अल्टीमेटम जरांगे पाटील यांची सरकारला दिला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version