Vidhan Bhavan Incident: विधानभवनाबाहेर जोरदार राडा,एका व्यक्तीने जाळून घेण्याचा केला प्रयत्न

मुंबईतील विधानभवनाबाहेर अधिवेशन सुरू असताना एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतले असून या घटनेमागील कारणाचा तपास सुरू आहे.
Vidhan Bhavan Incident: विधानभवनाबाहेर जोरदार राडा,एका व्यक्तीने जाळून घेण्याचा केला प्रयत्न

मुंबईतील विधानभवन परिसरात बुधवारी (11 मार्च 2026 ) एक धक्कादायक घटना घडली. अधिवेशन सुरू असताना एका व्यक्तीने विधानभवनाबाहेर स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने अचानक आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करत मोठा अनर्थ टाळला. या घटनेनंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

विधानभवनात सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे वेळीच कारवाई करून परिस्थिती हाताळण्यात यश आले. घटनेनंतर काही वेळ परिसरात गर्दी झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत नागरिकांना तेथून दूर केले. दरम्यान, संबंधित व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न नेमका कोणत्या कारणामुळे केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली असून या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रकारामुळे विधानभवन परिसरातील सुरक्षेच्या व्यवस्थेबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version