Local Body Election in Maharashtra: मतदानाच्या आधी मध्यरात्री निलेश राणेंचा पोलीस स्थानकात राडा, पैसे वाटपाचा आरोप आणि…

मालवण नगरपरिषद निवडणुकीपूर्वी नाकाबंदीत एका वाहनातून सापडलेल्या कॅशमुळे राजकीय वातावरण तापले आहे.
Local Body Election in Maharashtra:  मतदानाच्या आधी मध्यरात्री निलेश राणेंचा पोलीस स्थानकात राडा, पैसे वाटपाचा आरोप आणि…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषद निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण अक्षरशः पेटले आहे. निवडणूक प्रचार संपताच रात्री उशिरा देवगड भाजप तालुका अध्यक्ष महेश नारकर यांच्या कारमध्ये नाकाबंदी दरम्यान मोठी रोकड आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेनंतर शिवसेना नेते आमदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा भाजपवर पैसे वाटपाचा गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे.

घटना कशी उघडकीस आली?

नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयास्पद कार थांबवल्यानंतर ही रोकड सापडली. त्यानंतर गाडीला जप्त करून ती अधिक तपासासाठी मालवण पोलीस ठाण्यात आणण्यात आली. काही वेळातच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले, ज्यामुळे या प्रकरणाची गंभीरता वाढली. प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळताच आमदार निलेश राणे तात्काळ पोलीस ठाण्यात दाखल झाले. राणे पोलीस ठाण्यात पोहोचताच वातावरण तंग झाले. त्यांनी ठाम भूमिका घेत, “जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मी इथून जाणार नाही,” असा इशारा पोलिसांना दिला. त्यानंतर सोशल मीडियावरून त्यांनी थेट मालवणकरांना उद्देशून प्रश्न उपस्थित केले, “दबाव कोणाचा? याला संरक्षण कोणाचे आहे?”

राणेंची भाजपवर थेट टीका

राणे यांच्या मते, जप्त केलेली कार देवगड येथील भाजप कार्यकर्त्यांची असून, या वाहनामध्ये तालुकाध्यक्ष महेश नारकर आणि कृष्णकांत आडिवरेकर हे उपस्थित होते. नाकाबंदीमध्ये पोलिसांना मोठी रोकड सापडल्याने या रकमेचा उद्देश आणि ती कुठे जात होती याबाबत गंभीर शंका निर्माण झाली आहे. “ही रक्कम कोणासाठी? निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठीच का?” असा सरळ प्रश्न राणे यांनी पोलिसांसमोर उपस्थित केला.

हेही वाचा: Local Body Election in Maharashtra : राज्यात रणसंग्राम! मतदारराजाचा कौल कोणाला? मिनी विधानसभेचं मैदान कोण मारणार?

राजकीय दबावाची चर्चा वेगाने पसरली

घटनेनंतर पोलिस ठाण्यात काही तास तणाव जाणवत होता. भाजप नेत्यांकडून कथित हस्तक्षेपाची चर्चा स्थानिक पातळीवर वेगाने पसरली. या प्रकरणामुळे निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

मालवण निवडणूक अधिक चुरशीची

 या प्रकरणामुळे मालवण नगरपरिषद निवडणूक केवळ राजकीय स्पर्धा न राहता अशा नव्या वळणावर पोहोचली आहे. नाकाबंदीत सापडलेली रोकड, भाजप नेत्यांचे पोलिस ठाण्यातील हालचाली आणि राणेंचा आक्रमक सूर यामुळे संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आणि तर्कवितर्कांना जोर आला आहे.

पुढील तपास महत्त्वाचा

 पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून रोकड नेमकी किती आणि कुणाची होती, हे तपासात स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेने निवडणुकीत भ्रष्टाचार आणि दबावाच्या राजकारणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसते.

हेही वाचा: Pune Bus Accident : नियंत्रण सुटलं अन् भरधाव बस थेट फुटपाथवर! 5 जणांना चिरडलं तर दोन भावंडांचा जागीच मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version