महेश बाबूने घेतली महागडी गाडी

महेश बाबूने घेतली महागडी गाडी

मुंबई, २५ जून २०२३, प्रतिनिधी : दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपल्या उत्तम अभिनयाची जादू करणारा अभिनेता महेश बाबूचे बरेच चाहते आहेत. महेश बाबू हा तेलगू चित्रपटांमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यामुळे त्याची जीवनशैलीसुद्धा एखाद्या मोठ्या स्टार सारखीच आहे. त्याच्या आकडे बरीच महागड्या गाड्या आहेत. त्यामुळे त्याचे चाहते महेश बाबूच्या केवळ अभिनयाकडेच नाही तर त्याच्या या गाड्यांच्या कलेक्शनकडेही आकर्षित होत असतात. अशातच आता महेश बाबूने त्याच्या वाहनांच्या ताफ्यात आणखी एक नाव जोडले आहे. नुकतेच त्याने एक महागडी गाडी खरेदी केली आहे.

दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूने नवीकोरी रेंज रोव्हर SV खरेदी केली आहे. विशेष म्हणजे लक्ष वेधून घेणाऱ्या सोनेरी रंगाच्या या गाडीची किंमत खरं तर आश्चर्यचकीत करणारी आहे. कारण या रेंज रोव्हर SVची किंमत जवळपास ५.४ कोटी रुपये इतकी आहे.

बऱ्याच कलाकारांकडे महागड्या गाड्या आहेत. त्यातही रेंज रोव्हर ही अनेक सेलिब्रिटींची आवडती कार आहे. परंतू महेशने खरेदी केलेली ही गाडी काहीशी वेगळी आहे. कारण हैदराबादमधील या रंगाची ही एकमेव रेंज रोव्हर गाडी आहे. महेशने घेतलेली ही ही रेंज रोव्हर सध्या भारतात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्वात महागड्या कारपैकी एक आहे. महेशच्या गाडीचे फारच सुंदर फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version