महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र ठरले

महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र ठरले आहे असे महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र ठरले

मुंबई : महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र ठरले आहे. निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला संधी द्यायची असा निर्णय महायुतीने घेतला आहे. जागावाटप कोणताही वाद न होता पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. मविआच्या उमेदवारांना टक्कर देऊन निवडणूक जिंकू शकतील अशा उमेदवारांना संधी देऊ, असे संकेत बावनकुळे यांनी दिले. मोक्याच्या जागा जिंकण्यासाठी महायुती पूर्ण ताकद लावणार आहे, असेही बावनकुळे म्हणाले. जिथे विद्यमान लोकप्रतिनिधी कमकुवत पडत असेल तिथे पर्यायी जिंकू शकणारा उमेदवार दिला जाईल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version