महाराष्ट्रात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक ?

महाराष्ट्रात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक ?

मुंबई : महाराष्ट्रात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. याआधी २०१९ मध्ये महाराष्ट्रात एका टप्प्यात विधानसभेसाठी मतदान झाले. राज्यात २०१९ मध्ये २१ ऑक्टोबर रोजी मतदान झाले आणि २४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला. यामुळे यावेळी राज्यात ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

देशाच्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त शुक्रवारी दिवसभर महाराष्ट्रातील तयारीचा आढावा घेणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनाही भेटण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version