महाराष्ट्र दुय्य्म सेवा मुख्य परीक्षा २९ जानेवारीला होणार

महाराष्ट्र दुय्य्म सेवा मुख्य परीक्षा २९ जानेवारीला होणार

राज्य लोकसेवा आयोगातर्फे आयोजित पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता महाराष्ट्र दुय्य्म सेवा मुख्य परीक्षाही पुढे ढकलण्यात आली आहे. याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्य दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक १ आर, २२ जानेवारीऐवजी २९ जानेवारी रोजी तर दुय्य्म सेवा मुख्य पेपर क्रमांक २, पोलीस उपनिरीक्षक ही परीक्षा २९ जानेवारीऐवजी ३० जानेवारीला घेण्यात येणार आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या संदर्भात सरकारकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून आढावा घेण्यात येईल, असेही आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

परीक्षांचे सुधारित वेळापत्रक mpsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षांच्या जाहिराती प्रसिद्ध न झाल्यामुळे उमेदवारांचे वय वाढत होते. त्यामुळे या उमेदवारांना परिक्षा देता यावी यासाठी हे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version