BMC Election 2026 : निवडणूक मतदान प्रक्रियेवर राज ठाकरेंचा संताप, म्हणाले, ‘संपूर्ण प्रकार फ्रॉड…’

आधी प्रशासनाने तो नाकारला आणि आता स्वतःच ...
BMC Election 2026 : निवडणूक मतदान प्रक्रियेवर राज ठाकरेंचा संताप, म्हणाले, ‘संपूर्ण प्रकार फ्रॉड…’

राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, “सध्याची सिस्टीम ही केवळ विरोधकांना संपवण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांना जिंकवण्यासाठी काम करत आहे. दुबार मतदारांचा विषय आम्ही लावून धरला तेव्हा आधी प्रशासनाने तो नाकारला आणि आता स्वतःच दुबार मतदारांची यादी जाहीर केली. हा संपूर्ण प्रकार फ्रॉड आहे.” 

पुढे ते म्हणाले की, “आज तर वेगळेच दिसतेय. शाईऐवजी पेन आणले आहे, त्याची शाई पुसली जातेय. ही काही चांगली लोकशाहीची लक्षणे नाहीत. अशा फ्रॉड निवडणुका घेऊन अशाप्रकारे सत्तेत येणे म्हणजे विजय म्हणत नाहीत. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला मर्यादा असायला हव्यात”.

नंतर ते म्हणाले की, “हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला आधी दाखवण्यात आले नाही. मतमोजणीच्या वेळी हे यंत्र वापरले जाणार आहे. अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करून मिळवलेला विजय हा विजय नसतो,” असेही ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version