Ravindra Chavan: दिल्लीत रात्री उशिरा राजकीय हालचाली; चव्हाण-शहा भेटीत निवडणूक रणनीतीवर मोठा निर्णय?

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेऊन फडणवीस-शिंदे यांच्या चर्चेचा सविस्तर अहवाल सादर केला.
Ravindra Chavan: दिल्लीत रात्री उशिरा राजकीय हालचाली; चव्हाण-शहा भेटीत निवडणूक रणनीतीवर मोठा निर्णय?

नवी दिल्ली: राज्यातील राजकीय वातावरण बदलला पुन्हा एकदा वेग आला आहे. राज्यातील आगामी निवडणुका, मनपा सत्तेचे नव्या गणितांनुसार होणारे बदल आणि महायुतीची संभाव्य दिशा या सर्वांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ताण निर्माण झाला आहे. अलीकडील नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि शिवसेना शिंदे गट आमनेसामने उभे राहिल्याने महायुतीतील मतभेद उघड झाल्याची चर्चा रंगली होती. अशातच दिल्लीत मध्यरात्री उशिरा झालेल्या एका महत्त्वाच्या बैठकीने राजकीय हालचालींचे परिमाण अधिकच बदलले.

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. ही भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वाच्या चर्चेनंतर झाली. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्यातील बदलत्या राजकीय समिकरणांचा आढावा घेतल्यानंतर चव्हाण यांनी संपूर्ण परिस्थितीचा सविस्तर अहवाल शहा यांच्याकडे सादर केला. यामुळे दिल्लीतील बैठकीला अधिक रणनीतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. फडणवीस-शिंदे बैठकीत आगामी मनपा निवडणुकीसाठी महायुतीचा आराखडा, उमेदवारांची प्राथमिक मांडणी आणि काही ठिकाणी स्वतंत्र लढण्याचा पर्यायही गंभीरपणे विचारात घेतल्याचे कळते.

हेही वाचा: Pune Land Case : 'पोलीस उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाचे संरक्षण करत आहेत का?'; पुणे जमीन व्यवहारप्रकरणी हायकोर्टाची गंभीर टिप्पणी

या सर्व चर्चेचा अहवाल चव्हाण यांनी शहा यांच्यासमोर ठेवताना भाजपने स्वतंत्र लढल्यास काय समीकरण तयार होऊ शकेल, आणि महायुती कायम राहिली तर कोणत्या मनपांमध्ये सत्ता निश्चित राहू शकते, याचा अंदाज बांधण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महापालिकांमध्ये भाजप स्वतःचा महापौर बसविण्याच्या स्थितीत असू शकतो, तर काही ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून स्थिर सत्ता प्रस्थापित करता येण्याची शक्यता आहे. यासंबंधीची आकडेवारी आणि मतांचे आकलन देखील शहा यांच्या समोर मांडण्यात आल्याचे बोलले जात आहे.

त्यामुळे केंद्र आणि राज्य नेतृत्व एकत्र येऊन पुढील काही महिन्यांसाठी निवडणूक आराखडा अंतिम करण्याच्या दिशेने काम करत असल्याचे स्पष्ट होते. दिल्लीतील ही मध्यरात्रीची हालचाल आणि भाजपच्या रणनीती बैठकींमधील उत्सुकता पाहता, आगामी मनपा तसेच विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राज्यात मोठे राजकीय वळण दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीची पुढील दिशा, उमेदवारीचे गणित आणि स्वतंत्र लढाईचा मुद्दा हे सर्व मिळून महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन समीकरणांची बीजे रोवली जात असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

हेही वाचा: Illegal Exchange Racket: दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 3.5 कोटींच्या जुन्या नोटांसह चौघांना अटक

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version