Sunetra Pawar: शासकीय रुग्णालयात सुनेत्रा पवारांची ‘दादा’स्टाईल भेट! अधिकारी, कर्मचाऱ्यांना अस्वच्छतेवरून घेतलं फैलावर, व्हिडीओ पाहून आली अजित पवारांची आठवण

रुग्णालयातील अस्वच्छतेवरून त्यांनी रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 
Sunetra Pawar: शासकीय रुग्णालयात सुनेत्रा पवारांची ‘दादा’स्टाईल भेट! अधिकारी, कर्मचाऱ्यांना अस्वच्छतेवरून घेतलं फैलावर, व्हिडीओ पाहून आली अजित पवारांची आठवण

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री  अजित पवार जसे कोणतीही पूर्वसूचना न देता दवाखाने शासकीय कार्यालयांना भेटी द्यायचे, तशीच भेट रविवारी सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधील रुग्णालयाला दिली. रुग्णालयातील अस्वच्छतेवरून त्यांनी रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. 

यावेळी सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करत त्यांनी रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा, स्वच्छता, औषधांचा पुरवठा तसेच एकूण आरोग्य सेवा व्यवस्थेचा आढावा घेतला. भेटीच्या वेळी काही कर्मचारी रुग्णांना सेवा देण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे निदर्शनास आल्याने सुनेत्रा पवार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. 

त्याचप्रमाणे कामात हलगर्जीपणा करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे लिहून घेण्यास सांगत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्या.

कोणताही गाजावाजा किंवा राजकीय दिखावा न करता त्यांनी रुग्णालयातील प्रत्येक विभागात जाऊन रुग्णांशी आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. रुग्णांना भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version