Maharashtra Police New Rules : आता ‘खाकी स्वॅग’ दाखवता येणार नाही! पोलिसांसाठी नवीय नियमावली जाहीर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास…

विधीमंडळातही काही आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, ज्याची दखल आता प्रशासनाने घेतली आहे.
Maharashtra Police New Rules : आता ‘खाकी स्वॅग’ दाखवता येणार नाही! पोलिसांसाठी नवीय नियमावली जाहीर,  नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास…

पोलीस दलामध्ये शिस्त टिकून राहावी आणि गांभीर्य राहावे यासाठी प्रशासनाकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. हा नियम वर्दीसंदर्भात घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पोलीस समाजमाध्यमांवर वर्दीत अर्थात युनिफॉर्ममध्ये फोटो, रिल्स तसेच व्हिडीओ पोस्ट करू शकणार नाहित. 

यासंदर्भात, विशेष शाखेचे उपायुक्त दत्तात्रेय कांबळे यांनी गुरुवारी परिपत्रक काढून स्पष्ट केले की अनेक कर्मचारी गणवेशात व्हिडिओ बनवताना कर्तव्यावरील संवेदनशील ठिकाणे, सरकारी वाहने आणि शस्त्रे यांचे चित्रीकरण करतात. यामुळे ऑपरेशनल सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. विधीमंडळातही काही आमदारांनी हा मुद्दा उपस्थित केला होता, ज्याची दखल आता प्रशासनाने घेतली आहे.

हेही वाचा – India US Trade Deal: भारत-अमेरिका महत्त्वाची बैठक अचानक रद्द; टॅरिफवर अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम 

यसाठी आता, मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबला विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. 'खाकी स्वॅग' सारख्या ट्रेंडवर आता पूर्णपणे बंदी येणार असून, खासगी आयुष्य आणि कर्तव्य यांची सरमिसळ टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून 'खाकी स्वॅग' नावाचा ट्रेंड पोलिसांमध्ये लोकप्रिय झाला होता. मात्र, यामुळे कर्तव्यावरील गोपनीयता भंग पावत असल्याची तक्रार होती.   सोशल मीडियाचा वापर केवळ वैयक्तिक कामासाठीच करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विधानसभेतही लोकप्रतिनिधींनी या विषयावर चिंता व्यक्त केली होती. 

हेही वाचा – Tamhini Ghat Alternative Route: ताम्हिणी घाटातील वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार? 50 किलोमीटर अंतर कमी करणारा 'हा' नवा मार्ग लवकरच होणार सुरू 

याच पार्श्वभूमीवर आता पोलीस प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. मुंबई पोलिसांची सोशल मीडिया लॅब आता सर्व प्लॅटफॉर्मवर लक्ष ठेवून असेल, जेणेकरून नियमांचे उल्लंघन होणार नाही. ज्याच्याकडून याचे उल्लंघन होईल त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version