मुंबई : लोकसभेची निवडणूक संपताच विधान परिषदेच्या निवडणुकीचे धुमशान सुरू झाले आहे. विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २७ जून रोजी होईल. यानंतर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी होणार आहे.
विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. याआधी लोकसभेची निवडणूक असल्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. एकूण तेरा दिवस कामकाज चालणार आहे. शनिवार २९ जून २०२४ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील. पावसाळी अधिवेशनाआधी बुधवार, २६ जून रोजी विधान परिषदेच्या चार मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे.
विधान परिषद, चार मतदारसंघांसाठी निवडणूक –
भाजपाचे उमेदवार
शिउबाठाचे उमेदवार
काँग्रेसचे उमेदवार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.