उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. नेहमीप्रमाणे आज सर्व पक्षांची बैठक झाली. महाराष्ट्राची एक उच्च आणि प्रगत परंपरा आहे. अनेक विकासात्मक योजना राबविण्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर राहिला आहे आणि गुंतवणूकदारांचीही महाराष्ट्राला नेहमीच पहिली पसंती राहिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला चहापानासाठी निमंत्रित केले होते. मात्र, सरकारच्या अपयशामुळे आणि जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही या चहापानाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. ही भूमिका आम्ही यापूर्वीही स्पष्टपणे मांडली आहे.
सरकारच्या वागणुकीत किंवा कामकाजात काही सकारात्मक सुधारणा झालेली दिसत नाही. राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. आज 21 जून असून पावसाळा सुरू झाला असला तरी अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. एल निनोचे संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, पाणीटंचाई आणि कृषी व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.