Petrol Diesel Rate Today : देशभरात पेट्रोल डिझेल स्वस्त, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती दर?

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या चढउतारामुळे शहरनिहाय दर वेगळे आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व शहरांचे आजचे प्रति लिटर नवे दर जाहीर झाले आहेत.
Petrol Diesel Rate Today : देशभरात पेट्रोल डिझेल स्वस्त, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती दर?

मुंबई: महाराष्ट्रातील सर्वसामान्यांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर हा रोजचा महत्त्वाचा विषय. इंधनाचे दर महागाईवर थेट परिणाम करत असल्याने नागरिक रोजचे दर तपासत असतात. आज 18 नोव्हेंबर 2025 रोजीचे पेट्रोल – डिझेलचे नवे दर सकाळी सहा वाजता जाहीर झाले असून राज्यातील विविध शहरांमधील या दरांमध्ये किरकोळ घट दिसत आहे.

इंधनाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती, वाहतूक खर्च, स्थानिक कर आणि व्हॅट यावर ठरतात. त्यामुळे राज्यानुसारच नाही तर शहरनिहायही किंमतींमध्ये फरक दिसतो. खाली दिलेल्या तक्त्यात आजचे ताजे दर पाहू शकता.

हेही वाचा: Maha-Mumbai CNG : मुंबईमधील सीएनजी पुरवठा विस्कळीत होण्याचे धक्कादायक कारण समोर! महानगर गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांचा खुलासा

महाराष्ट्रातील आज चे पेट्रोल – डिझेलचे दर (प्रति लिटर, रुपायांमध्ये)

अहिल्यानगर – पेट्रोल 104.50, डिझेल 91.02, अकोला – पेट्रोल 104.11, डिझेल 90.68, अमरावती – पेट्रोल 105.21, डिझेल 91.73, छत्रपती संभाजीनगर – पेट्रोल 104.73, डिझेल 91.24, भंडारा – पेट्रोल 104.99, डिझेल 91.52, बीड – पेट्रोल 105.44, डिझेल 91.93, बुलढाणा – पेट्रोल 105.50, डिझेल 91.03, चंद्रपूर – पेट्रोल 104.37, डिझेल 90.93, धुळे – पेट्रोल 104.55, डिझेल 91.08, गडचिरोली – पेट्रोल 104.92, डिझेल 91.46, गोंदिया – पेट्रोल 105.50, डिझेल 92.03, हिंगोली – पेट्रोल 105.50, डिझेल 92.03, जळगाव – पेट्रोल 105.22, डिझेल 91.71, नाशिक – पेट्रोल 103.87, डिझेल 90.41, धाराशिव – पेट्रोल 104.72, डिझेल 91.25, पालघर – पेट्रोल 103.95, डिझेल 90.45, परभणी – पेट्रोल 105.50, डिझेल 92.03, पुणे – पेट्रोल 103.75, डिझेल 90.29, रायगड – पेट्रोल 104.06, डिझेल 90.57, रत्नागिरी – पेट्रोल 105.50, डिझेल 92.03, सांगली – पेट्रोल 103.39, डिझेल 90.94, सातारा – पेट्रोल 104.76, डिझेल 91.29, सिंधुदुर्ग – पेट्रोल 105.50, डिझेल 92.03, सोलापूर – पेट्रोल 105.15, डिझेल 91.64, ठाणे – पेट्रोल 103.95, डिझेल 90.46, वर्धा – पेट्रोल 105.02, डिझेल 91.55, वाशिम – पेट्रोल 104.63, डिझेल 91.17, यवतमाळ – पेट्रोल 104.93, डिझेल 91.46,जालना – पेट्रोल 105.50, डिझेल 92.03, कोल्हापूर – पेट्रोल 104.45, डिझेल 91.00, लातूर – पेट्रोल 105.22, डिझेल 91.73, मुंबई – पेट्रोल 103.50, डिझेल 90.03, नागपूर – पेट्रोल 104.17, डिझेल 90.73, नांदेड – पेट्रोल 105.50, डिझेल 92.03, नंदुरबार – पेट्रोल 105.38, डिझेल 91.87

इंधन दर जाणून घेण्याचा सोपा मार्ग; SMS सेवा

आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर दररोज जाणून घेण्यासाठी SMS सेवा वापरू शकता:

  • Indian Oil (IOC): RSP<डीलर कोड> पाठवा – 9224992249

  • HPCL: HPPRICE <डीलर कोड> पाठवा – 9222201122

  • BPCL: RSP<डीलर कोड> पाठवा – 922311222

हेही वाचा:  Gold Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज मोठा बदल; 10 ग्रॅम सोन्याचा भाव पाहून थक्क व्हाल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version