Eknath Shinde Meet PM Modi : मोठी राजकीय घडामोड! आज दिल्लीत एकनाथ शिंदे घेणार पंतप्रधान मोदींचा भेट; बंद दाराआड होणार चर्चा, नेमकं कारण काय?

Eknath Shinde Meet PM Modi : मोठी राजकीय घडामोड! आज दिल्लीत एकनाथ शिंदे घेणार पंतप्रधान मोदींचा भेट; बंद दाराआड होणार चर्चा, नेमकं कारण काय?

मुंबई : सर्वोच्च न्यायालयात सध्या शिवसेना चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणावर मॅरेथॉन सुनावणी सुरु असतानाच राजकीय क्षेत्रातून मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे आज, दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेनऊ वाजता एकनाथ शिंदे हे ठाकरे गटातून फुटून बाहेर पडलेल्या सहा खासदारांसोबत मोदींच्या भेटीला जाणार असल्याचे समजते. या भेटीकडे अनेकांचे लक्ष लागले असून नेमकी काय चर्चा होणार याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

हेही वाचा : Maharashtra Teacher Recruitment: सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार! 30 हजारांहून अधिक शिक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, महायुती सरकारचा मोठा निर्णय

गेल्या दोन दिवसांत ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल ठाकरे गटाच्या बाजूने न्यायालयात जोरदार युक्तीवाद करताना दिसत आहेत. विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यावर त्यांच्याकडून भर देत युक्तिवाद केला जात असून, यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह ठाकरे गटाला मिळू शकते अशी आशा पल्लवीत झाली आहे. मात्र, न्यायालय या निर्णायक टप्प्यावर निकाल देणार की पुन्हा सुनावणी लांबणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version