Maharashtra Cabinet Meeting : मच्छिमारांसाठी मुलभूत सोयी सुविधा, मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठ आणि…मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

याचबरोबर पदभरती प्रक्रियेत सुधारणा, मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठाच्या स्थापनेसह आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 
Maharashtra Cabinet Meeting : मच्छिमारांसाठी मुलभूत सोयी सुविधा, मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठ आणि…मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये महत्त्वपूर्ण घेतलेला निर्णय म्हणजे आशाताईंच्या नावाने संगीत अकॅडमी. या निर्णयातून आशाताईंना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. याचबरोबर पदभरती प्रक्रियेत सुधारणा, मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठाच्या स्थापनेसह आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. 

राज्य मंत्रिमंडळाचे सात मोठे निर्णय
1. सामान्य प्रशासन विभाग : 
शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र 2047 च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा. एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या 53 वरून 153. संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. भरती प्रक्रीया सुलभ होणार. युपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविणार. 

2. नगरविकास विभाग: 
कुळगांव-बदलापूर मधील मंजूर विकास आराखड्यातील स्टेडीयमच्या आरक्षणात बदल करून वीज उपकेंद्राकरिता जमीन देणार. चार एकर जमीन टाटा पॉवर कंपनीस हस्तांतरीत करण्याचा निर्णय. 

3. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग:  
मुंबईत आयईएस स्किल टेक विद्यापीठ होणार. विद्यापीठ स्थापनेस मंजुरी. कायम स्वयंअर्थसहाय्यित खाजगी कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेमुळे कुशल मनुष्यबळ विकासाला चालना मिळणार. 

4.  पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग:

 नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधी अंतर्गत सागरी जिल्ह्यांमध्ये मच्छिमारांसाठी मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणार. त्यासाठी 61कोटी 24 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी. 

5. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग : 
राज्यातील वैद्यकीय शिक्षण प्रणाली, नर्सिंग सेवा आणि आरोग्य सेवा वितरण यंत्रणा अधिक सक्षम होणार. सशक्तीकरण प्रकल्प राबविण्यासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) कडून 3 हजार 708 कोटींची वित्तीय सहाय्य उपलब्ध होणार. 

5.नियोजन विभाग :  
नीति आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे व परभणी या आणखी सहा जिल्हयांचा समावेश. त्यामुळे सध्याच्या 27 आकांक्षित तालुक्यांसह नवीन 150 अशा एकूण 177 तालुक्यांमध्ये संतुलित, सर्वांगिण व गतिमान विकासाच्या योजना राबविणार. 

6. वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग : 
वैद्यकीय व्यावसायिकांचे नियमन करणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेशी निगडीत अधिनियमात सुधारणा करणार. उच्चस्तरीय समितीच्या शिफारशीनुसार प्रशासन व संस्थात्मक रचनेत बदल होणार. परिषदेमधील सदस्यांची नियुक्ती निवडणुकीच्या ऐवजी शासनाकडून नामननिर्देशन पद्धतीने होणार 

7. सामान्य प्रशासन विभाग : 
शासन सेवेतील पदांच्या भरती प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र 2047 च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा. एमपीएससीच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवांतर्गत संवर्गांची संख्या 53 वरून 153. संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नव्याने काही सेवांचा समावेश होणार. भरती प्रक्रीया सुलभ होणार. युपीएससीच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबविणार. 

आशा भोसले संगीत अकॅडमी : 
महान गायिका आशा भोसले यांचे काल निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्यावतीने मुंबईत 'आशा भोसले संगीत अकॅडमी' स्थापन करणार आहे. राज्य सरकारकडे वांद्रे-अंधेरी दरम्यान हक्काची जागा उपलब्ध करून देण्याची आशा भोसले यांनी मागणी केली होती. 
आता वांद्रे-अंधेरी दरम्यान आशाताईंच्या नावाने संगीत अकॅडमी' उभारण्यात येणार असल्याचे निश्चित झालं आहे. यासंदर्भात जागा शोधण्यासाठी म्हाडाला आदेशही देण्यात आले आहेत. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version