Maharashtra Budget 2026 : देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; 50 लाख प्रत्यक्ष रोजगारनिर्मित, आता प्रत्येकजण…

यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे.
Maharashtra Budget 2026 : देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा;  50 लाख प्रत्यक्ष रोजगारनिर्मित, आता प्रत्येकजण…

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणनवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हे जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याचे उद्देश आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हा व्यासपीठ तयार करत आहोत. 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल अशी घोषणा केली आहे. 

त्याचप्रमाणे,  30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषि विद्यापीठात एआयजी मदत घेतली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. 1 कोटी 31 लाख फार्मर आयडी फेब्रुवारीपर्यंत झाले आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असेही ते म्हणाले. 

हेही वाचा – Maharashtra Budget 2026: अजित पवारांच्या स्मृतींना सरकारकडून मोठा सन्मान; ‘गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ आणि भव्य स्मारकाची घोषणा 

महाराष्ट्रातील पुणे हे जीसीसीसाठी सर्वात पसंतीचे शहर ठरत आहे. 4 लाख उच्च कुशल रोजगार निर्मितीचे लक्ष आहे. निवडक 50 पर्यटन स्थळी पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version