विधानपरिषदेच्या १ जागेसाठीची पोटनिवडणूक आणि निकाल २४ जानेवारीला

विधानपरिषदेच्या १ जागेसाठीची पोटनिवडणूक आणि निकाल २४ जानेवारीला

राज्याच्या विधानपरिषदेच्या १ जागेसाठीची पोटनिवडणूक येत्या २४ जानेवारीला होणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.

या पोटनिवडणुकीचा निकाल देखील २४ जानेवारीला लागणार आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे निवडून गेले. त्यामुळे विधानपरिषदेची १ जागा रिकामी झाली.

या आधी धनंजय मुंडे हे विधानपरिषदेतील आमदार होते.

या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी आहे. तर दाखल केलेल्या अर्जांची छाननी १५ जानेवारीला करण्यात येणार आहे.

उमेदवार १७ जानेवारीपर्यंत आपले अर्ज मागे घेऊ शकतात. या पोटनिवडणुकीचा निकाल २४ जानेवारीला म्हणजेच मतदानाच्या दिवशीच जाहीर करण्यात येणार आहे.

या विधानपरिषद सदस्याचा कार्यकाळ 7 जुलै 2022 पर्यंत राहिल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version