नगरपालिका आणि नगरपरिषदेचा गुलाल उधळल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सर्वच पक्षा आता कामाला लागले असून आजपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. अर्ज भरण्यासाठी आज पासून सुरुवात झाली असून ३० डिसेंबर पर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे
31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी करून अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 2 जानेवारी रोजी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यात विशेष बाब म्हणजे जागावाटपांची चर्चा देखील सुरू असल्याने इच्छुकानमध्ये संभ्रमांचे वातावरण निर्माण झाली आहे. 3 जानेवारीला उमेदवारांना निवडणूक चिन्हे दिली जाणार आहेत.
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याप्रमाणे 23 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत उमेदवारी अर्ज दाखल येणार आहेत. 30 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तसेच 25 डिसेंबर आणि 28 डिसेंबर रोजी सुट्टीच्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे महापालिकेने सांगितले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीची चर्चा स्पष्ट होत नसल्यामुळे आज अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची गर्दी होणार की नाही याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.