Rahul Narvekar Video : राऊतांचा आरोप ठरला फोल, हा तर दोन स्थानिकांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न; नार्वेकरांच्या व्हिडीओवर स्थानिक म्हणाले की…

आमच्या वादाशी राहुल नार्वेकर यांचा काहीही संबंध नसल्याचे शेतकरी रमेश पाटील यांनी सांगितले.
Rahul Narvekar Video : राऊतांचा आरोप ठरला फोल, हा तर दोन स्थानिकांमधील वाद मिटवण्याचा प्रयत्न; नार्वेकरांच्या व्हिडीओवर स्थानिक म्हणाले की…

अलिबाग : शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स पोस्टवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा अलिबागमधील एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये राहुल नार्वेकर स्थानिकांमधील वादानंतर तिथून निघून जाताना दिसत आहेत. याबाबत सांगताना राऊत म्हणाले की, अलिबागमधील स्थानिकांच्या जागा बळकावण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र याबाबत एका मोठा खुलासा समोर आला आहे. तेथील स्थानिक शेतकरी रमेश पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हा आमचा वैयक्तिक वाद सुरू होता. आमच्या वादाशी राहुल नार्वेकर यांचा काहीही संबंध नाही. असे वादग्रस्त व्हिडिओतील स्थानिक रहिवाशानी म्हटले आहे. तसेच नार्वेकरांनी वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे समोर येत आहे. 

हेही वाचा : Sanjay Raut : नार्वेकरांच्या मागे पुन्हा शुक्लकाष्ट! राऊतांकडून व्हिडीओ ट्विट, नेमकं प्रकरण काय?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version