गोंदियात ९ कृषी केद्रांचे परवाने निलंबित

गोंदियात ९ कृषी केद्रांचे परवाने निलंबित

गोंदिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी कृषी केंद्रावर कारवाई करत ९ कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत. कृषी केंद्रधारकांना पॉस मशिनद्वारे खत विकणे केंद्र शासनाने अनिवार्य केले असतांना सुद्धा जिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालक ऑफलाइन पद्धतीने अनुदानित खताची विक्री करत असल्याचे आढळून आले. कारवाईमध्ये जिल्ह्यातील ९ कृषी केंद्राचे परवाने सहा महिन्यांकरिता रद्द करण्यात आले आहे.

तक्रारी प्राप्त कृषी केंद्रामध्ये मोहिम राबवून कृषी केंद्राची तपासणी केली असता अनुदानित खताची ऑफलाईन पध्दतीने खताची विक्री करणे, परवाना ग्राहकास सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे, भाव साठा फलक अद्यावत न ठेवणे, परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्र नसताना निविष्ठा विक्री करणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, फॉर्म एन मध्ये साठा नोंदवही न ठेवणे, बिलावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी न घेणे तसेच बॅच नंबर, उत्पादनाची तारीख न लिहिणे, अशा कारणासाठी ९ कृषी केंद्राचे परवाने निलंबित केल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांनी दिली.

६ महिन्याकरिता रासायनिक खताचे परवाने निलंबित केलेली केंद्र

१) डोंगरे कृषि केंद्र, साखरीटोला ता. सालेकसा
२) मुन्ना कृषि केंद्र, कोडेलोहारा ता. तिरोडा
३) साठवणे कृषि केंद्र, सरांडी ता. तिरोडा
४) मोना कृषि केंद्र, एकोडी ता. गोंदिया
५) आदर्श कृषि केंद्र, चुटीया ता. गोंदिया
६) मॉ वैष्णवी कृषि केंद्र, मुंडीकोटा ता. तिरोडा

३ महिन्याकरिता रासायनिक खताचे परवाने निलंबित केलेली केंद्र

१) साई कृषि केंद्र, कोयलारी ता. तिरोडा
२) गजानन कृषि केंद्र, तिगाव ता. आमगाव
३) राधे कृषि केंद्र, आमगाव खुर्द ता. सालेकसा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version