डोंबिवली शहरात असंख्य वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असते. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेबाबत जोरदार काम सुरु आहे.
ख्रिसमसच्या निमित्ताने वाहतूक पोलिसांकडून जनजागृतीचा प्रयत्न करण्यात आला. सांताक्लॉजकडून वाहनचालकांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले.
डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौक, टिळक चौक आणि मानपाडा रोडवर वाहतूक पोलिसांनी सांताक्लॉजला बरोबर घेऊन जगजागृती केली.
वाहतुकीच्या नियमांनुसार दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक असते. मात्र डोंबिवलीत ९० टक्के वाहनचालक हेल्मेंट घालत नाही.
सांताक्लॉजने अशा दुचाकीस्वारांना थांबवून चॉकलेट देऊन वाहतूक नियमांची माहिती दिली. तसेच रिक्षात क्षमतेपेक्षा जास्त बसणाऱ्या प्रवाशांना देखील सांताक्लॉजने वाहतूक नियमांची माहिती दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.