लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी राज्य सरकारकडून मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे ज्या महिलांची ई-केवायसी राहिली आहे त्या महिलाकंडून ई-केवायसी केली जात आहे. मात्र आता जळगावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ई-केवायसी करुन देण्याच्या मोबदल्यात एका नराधमाने महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली आहे. तसेच इतर एका महिलेकडे प्रेमसंबंधाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी गोकुळ चव्हाण याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात महिलांच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेचे केवायसी करायचे असल्याने चव्हाण महिलेच्या घरी आला व कागदपत्रे घेत शरीरसुखाची मागणी केली.
तसेच अन्य एका महिलेला निवृत्ती वेतन पुन्हा सुरू करून देतो, असे म्हणत चव्हाण याने प्रेमसंबंधाची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीचे आवश्यक प्रक्रिया पार पडून देण्यासाठी महिलांकडे शरीर सुखाची तसेच प्रेम संबंधाच्या मागणीच्या या प्रकाराने जळगावात खळबळ उडाली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.