आज बाळासाहेब असते तर? – क्रांती रेडकर

आज बाळासाहेब असते तर? – क्रांती रेडकर

  मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांची बाजू मांडण्यासाठी आता त्यांची पत्नी क्रांती रेडकर मैदानात उतरल्या आहेत. मात्र नवाब मलिकांकडून रोज नवनवीत आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या त्रस्त पत्नीने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ‘शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं. आमच्या सोबत योग्य तो न्याय करा,’ अशी मागणी क्रांती रेडकर यांनी पत्राद्वार केली आहे.

क्रांती रेडकरने पत्रात म्हटले,

  माननीय उद्धव ठाकरे साहेब, लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झालेली मी मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करु नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करू नये हे त्या दोघांनी शिकवले आहे. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खाजगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे. सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघत आहेत.

  मी एक कलाकार आहे. राजकारण मला कळत नाही. आणि मला त्यात पडायचे सुद्धा नाही. आमचा काहिही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तरे चार चौघात उधळली जातात.  शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करून ठेवला आहे. विनोद करून ठेवला आहे.

  आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं. आज ते नाही पम तुम्ही आहात. त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो. तुम्ही आमचे नेतृत्व करत आहात आणि तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही कधीच माझ्यावर व माझ्या कुटुंबावर अन्याय होऊ देणार नाही ह्याची मला खात्री आहे. म्हणून एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याके न्यायाच्या अपक्षेने पाहत आहे. तुम्ही योग्य तो न्याय करा अशी विनंती. हे पत्र समीर वानखेडे यांनी क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version