कोल्हापुरात काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय

कोल्हापुरात काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. कोल्हापूर पोटनिवडणुकीसाठी मविआकडून जयश्री जाधव आणि भाजपकडून सत्यजित कदम रिंगणात आहेत तर, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापूर पोटनिवडणूकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले.

LIVE UPDATE :

दरम्यान, कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या सव्वीसाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय झाला आहे.


कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या चोवीसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ९२०१२ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम  ७३१७४ मतांनी पिछाडीवर आहेत.


कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या एकवीसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ७६३५७ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम ६०९४५ मतांनी पिछाडीवर आहेत.


कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या वीसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ७३३५७ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम ६०९४५ मतांनी पिछाडीवर आहेत.


कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या एकोणीसाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ७१९९१ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम ५७८९१ मतांनी पिछाडीवर आहेत.


कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या अठराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ६८७३२ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम ५४९१७ मतांनी पिछाडीवर आहेत.


कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या सतराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ६४७८४ मतांनी आघाडीवर आहेत.


कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या सोळाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ६१९८९ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम ४८२४० मतांनी पिछाडीवर आहेत.


कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या पंधराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ५८३५१ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम ४४३५३ मतांनी पिछाडीवर आहेत.


चौदाव्या फेरीत जयश्री जाधव यांना ३७५६ मते मिळाली आहेत तर सत्यजित कदम यांना २६६९ मते मिळाली आहेत. त्यानुसार जयश्री जाधव १२२६६ मतांनी आघाडीवर आहेत.


तेराव्या फेरीअखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव ५०७९७ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपाचे सत्यजित कदम ३९६६८ मतांनी पिछाडीवर आहेत.


कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या बाराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ४६४२१ मतांनी आघाडीवर आहेत. तर, भाजपचे सत्यजित कदम ३७१९६ मतांनी पिछाडीवर आहेत.


कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या अकराव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ४२४७५ मतांनी आघाडीवर आहेत. तर, भाजपचे सत्यजित कदम ३४३२८ मतांनी पिछाडीवर आहेत.


दहाव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २८६८ मते मिळाली आहेत तर भाजपच्या सत्यजीत कदम यांना ३७९४ मते मिळाली आहेत.


नवव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २७४४ मते तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २९३७ मते मिळाली आहेत.


आठव्या फेरीत जयश्री जाधव यांना २९८१ मते मिळाली आहेत. तर, भाजपच्या सत्यजित कदम यांना ३५०५ मते मिळाली आहे. तर याफेरीत सत्यजित कदम यांना जास्त ते मिळाली असली तरीही जयश्री कदम ९१५२ मतांनी आघाडीवर आहेत.


कोल्हापूर पोटनिवडणूक मतमोजणीच्या सातव्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव ३१०१२ मतांनी आघाडीवर आहेत तर भाजपच्या सत्यजिक कदम २१३३६ मतांनी पिछाडीवर आहेत.


कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या सहाव्या फेरीत जयश्री जाधव २७३७० मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम १८९०५ मतांनी पिछाडीवर आहेत.


पाचव्या फेरीत कदमवाडी, जाधववाडीमधील मतमोजणीत काँग्रेसच्या जयश्री जाधव २२,६८१ मतांनी आघाडीवर आहेत, तर भाजपचे सत्यजिच कदम यांना १५,९३३ मतांनी पिछाडीवर आहेत.


चौथ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्र जाधव आघाडीवर आहेत. जयश्री जाधव  यांना एकूण १९००८ मते मिळाली आहेत. तर सत्यजित कदम यांना ११७३५ मते मिळाली असून चौथ्या फेरीतही सत्यजित कदम पिछाडीवर आहेत.


कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या तीसऱ्या फेरीतही काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. जयश्री जाधव १५,२९९ मतांनी पुढे आहेत तर भाजपचे सत्यजित कदम यांना ७७९८ मते मिळाली आहेत.


कोल्हापूर उत्तर मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव १०३७१ मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे सत्यजित कदम ५२२४ मतांनी पिछाडीवर आहेत.


कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूकीच्या पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. जयश्री जाधव यांना पहिल्या फेरीत ४८५६ मते मिळाली आहेत. तर भाजपच्या सत्यजित कदम यांना २७१९ मते मिळाली आहेत. कसबा बावडा येथील ही मतमोजणी असून कसबा बावडा हा काँग्रेसचा प्रभाव असलेला परिसर आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version