Nagpur Kisan Gawande : भाजप आमदाराची मध्यस्थी; अखेर किसन गावंडेंनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, म्हणाले…

भाजपचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे यांनी कार्यकर्त्यांचा विरोध डावलून आणि पक्षनिष्ठेला प्राधान्य देत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
Nagpur Kisan Gawande : भाजप आमदाराची मध्यस्थी; अखेर किसन गावंडेंनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, म्हणाले…

Kisan Gawande: नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशी प्रभाग 13 (ड) मध्ये रंगलेल्या अभूतपूर्व नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. भाजपचे बंडखोर उमेदवार किसन गावंडे यांनी कार्यकर्त्यांचा विरोध डावलून आणि पक्षनिष्ठेला प्राधान्य देत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजप आमदार परिणय फुके यांनी स्वतः गावंडे यांच्या घरी जाऊन त्यांची मनधरणी केल्यानंतर हा पेच सुटला.

नेमका तोडगा कसा निघाला?

प्रभाग 13 (ड) मध्ये भाजपने किसन गावंडे आणि विजय होले या दोघांनाही ‘एबी फॉर्म’ दिल्याने गोंधळ निर्माण झाला होता. पक्षाने गावंडे यांना माघार घेण्यास सांगितल्याने संतापलेल्या समर्थकांनी त्यांना घरातच कुलूप लावून कोंडून ठेवले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून आमदार परिणय फुके यांनी थेट गावंडे यांचे घर गाठले. तिथे कार्यकर्त्यांशी संवाद साधून आणि गावंडे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून त्यांना माघार घेण्यास राजी केले.

हेही वाचा – HC On Extortion Case: मकोका अंतर्गत दोषी ठरलेली व्यक्तीही लढवू शकणार BMC निवडणूक; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

अर्ज मागे घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना किसन गावंडे भावूक झाले होते. ते म्हणाले, कार्यकर्त्यांचा माझ्यावर प्रचंड जीव आहे, त्यांनी प्रेमापोटी मला घरात कोंडून ठेवले होते. मात्र, माझ्यासाठी वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे. वरिष्ठ नेत्यांकडून मला निर्देश मिळाले आणि त्यानुसार मी माझा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – Nashik Election 2026 : अर्ज मागे घेण्यावरून नाशिकमध्ये भाजप समर्थकांमध्येच जुंपली; पोलिसांचा हस्तक्षेप

भाजपला बंडखोरी थोपवण्यात यश

आमदार परिणय फुके यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. किसन गावंडे हे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. कार्यकर्त्यांच्या काही भावना होत्या, पण चर्चेनंतर त्यांनी अर्ज मागे घेतला आहे. आता या प्रभागात कोणतीही बंडखोरी उरलेली नाही आणि भाजप एकदिलाने ही निवडणूक लढवेल, असा विश्वास फुके यांनी व्यक्त केला. 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version