मुंबई, १६ जून २०२३, प्रतिनिधी : ‘सा रे ग म प लिट्ल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वात घराघरात पोहोचलेली मराठमोळी गायिका कार्तिकी गायकवाड हीचे लाखो चाहते आहेत. ती समाज माध्यमांवर देखील नेहमी सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या सुमधुर आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असते. आता सध्या तिची एक पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.
गायिका कार्तिकी गायकवाड हिने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतलीय. त्यामागे सुद्धा एक खास कारण आहे.या भेटीचे फोटो तिने इंस्टाग्रामवर सामायिक केले आहेत. या फोटो खाली कार्तिकीने खास कॅप्शन लिहिलंय. कार्तिकीने लिहिलंय की,”महाराष्ट्र शासनाकडून बाबांना कंठ संगीत पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शासनाप्रती कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेब यांची आनंद आश्रम ठाणे येथे सदिच्छा भेट घेतली.”
पुढे कार्तिकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल एक व्यक्ती म्हणुन आपल्याविषयीचा आदर आणखी द्विगुणीत झाला.आपल्या पुढील कार्यासाठी खुप खुप शुभेच्छा.” अशा कौतुकास्पद भावना व्यक्त केल्या.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.