गेल्या काही दिवसांत कर्नाटकच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू होत्या. आज अखेर सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. आता सिद्धरामय्या यांची जागा काँग्रेसचेच नेते डी के शिवकुमार हे घेणार आहेत. सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा दिल्याचे जाहीर केले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, येत्या 30 मे रोजी डी के शिवकुमार हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. कर्नाटकच्या जनतेच्या हितासाठी मी हा राजीनामा देत आहे, असे सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे.दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कर्नाटकमधील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये आधी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार, अडीच वर्ष सिद्धरामय्या मुख्यमंत्री राहणार, आणि नंतर उर्वरीत अडीच वर्ष डी के शिवकुमार मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असं ठरलं.
त्याप्रमाणेच आता कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री हे डी के शिवकुमार असणार आहेत. त्यांची लवकरच विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड होईल आणि ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.