Nirmala Navale: ‘329 मतांचा पराभव अनपेक्षित आणि वेदनादायक…’; पराभवानंतर माजी सरपंच निर्मला नवले यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

भाजपच्या मनीषा पाचंगे यांनी विजय मिळवला. पराभवानंतर नवले यांनी इन्स्टाग्रामवर भावनिक प्रतिक्रिया देत कार्यकर्त्यांचे आभार मानले.
Nirmala Navale: ‘329 मतांचा पराभव अनपेक्षित आणि वेदनादायक…’; पराभवानंतर माजी सरपंच निर्मला नवले यांची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

पुणे : पुणे जिल्ह्यातील कारेगाव-कान्हूर मेसाई पंचायत समिती गणातील निवडणुकीत माजी सरपंच निर्मला नवले यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत भाजपच्या उमेदवार मनीषा पाचंगे यांनी 329 मतांनी विजय मिळवला.

निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असून, दिवंगत नेते अजित पवार यांनी त्यांच्यावर पक्षात महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर ‘वर्किंग प्रेसिडेंट एनसीपी युवती महाराष्ट्र’ असा उल्लेख आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. मात्र, अंतिम निकालात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. निर्मला नवले या इन्स्टाग्रामवर रील्सच्या माध्यमातून कायम सक्रिय असतात. 

पराभवानंतर निर्मला नवले यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्यांची पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी लिहले आहे – 

हेही वाचा: Heatwave Alert: सावधान! 2026 मध्ये उष्णतेचे सर्व रेकॉर्ड तुटणार; ‘अल निनो’मुळे पुढील 3 वर्षे तीव्र उन्हाचा तडाखा

माझ्या नेतृत्वावर निस्वार्थपणे जीवापाड प्रेम करणाऱ्या, आणि माझ्या सुख-दुःखात सदैव प्रामाणिकपणे माझ्यासोबत उभे राहणाऱ्या मी निवडून येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद. A

आपण सर्वांनी तुमची निर्मला पंचायत समितीवर जाण्यासाठी मागील दोन महिने जे अथक परिश्रम घेतले, रात्र दिवस एक करून जे कष्ट उपसले, त्या प्रत्येक प्रयत्नासाठी मी मनापासून ऋणी आहे.

हा 329 मतांनी झालेला पराभव अनपेक्षित आहे… आणि वेदनादायकही तो मी मान्य करते…. पण या पराभवापेक्षा तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि तुमची निष्ठा माझ्यासाठी खूप मोठा विजय आहे. तुमच्या या साथीनं मला पुन्हा उभं राहण्याची, नव्या जिद्दीनं पुढे जाण्याची ताकद दिली आहे. ही लढाई इथे थांबत नाही….तुमच्यासोबत चालायचा हा प्रवास आजही सुरूच आहे.असे लिहीत निर्मला नवले यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे. 

दरम्यान, कारेगाव-कान्हूर मेसाई गणातील या निकालामुळे स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. भाजपच्या मनीषा पाचंगे यांच्या विजयामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Mahashivratri 2026 : 15 फेब्रुवारीला महादेवांची विशेष कृपा! ध्यानावस्थेतून बाहेर येणार भोलेनाथ; मनोकामनापूर्तीसाठी करा ‘हा’ सोपा उपाय

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version