संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, आज नितेश राणे यांची चार तास चौकशी झाली. या चौकशीनंतर सिंधुदुर्ग पोलीसांनी नितेश राणेंना गोव्यात घेऊन गेले. त्यामुळे आता संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणे यांची गोव्यात चौकशी होणार आहे.
नितेश राणे यांची दोन टप्प्यांमध्ये चौकशी करण्यात आली. दरम्यान, चौकशीचा एक भाग म्हणून नितेश राणेंना कणकवली पोलीस गोव्यात घेऊन गेले. नितेश राणेंची चौकशी झाल्यानंतर कणकवली पोलीस नितेश राणेंना घेऊन सावंतवाडी येथे न जाता थेट गोव्यात दाखल झाले.
संतोष परब हल्ला प्रकरणातील चौकशीचा एक भाग म्हणून नितेश राणेंना घेऊन कणकवली पोलीस गोव्यात गेले असल्याची माहिती आहे. तसेच याप्रकरणी नितेश राणे यांना पोलिसांनी ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.