कल्याण: बेकायदेशीर दत्तक प्रक्रियेद्वारे लहान मुलाची परस्पर खरेदी विक्री केली जात असल्याची गंभीर बाब जिल्हा महिला बाल संरक्षण कक्ष आणि कल्याण गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत उघड झाली आहे.
मूल दत्तक घेण्यासाठी इच्छुक पालकांना हेरून, तसेच गरीब पालकांना पैशाचे आमिष दाखवत त्यांची मुले विकणाऱ्या महिलेला कल्याण स्टेशन परिसरात जिल्हा महिला आणि बाल संरक्षण कक्षासह कल्याण गुन्हे शाखेने रंगेहात पकडले आहे. तसेच स्वतःच्या मुलाची विक्री करणाऱ्या दांपत्याला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
या ५ महिन्याच्या बाळाला महिला बाल विकास विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.मानसी जाधव असं आरोपी महिलेचं नाव असून सदर महिलेने यापूर्वी या २ ते ३ बालकांची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.