वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे निधन

वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांचे निधन

मुंबई, ८ जून,२०२३, प्रतिनिधी :

दूरदर्शनच्या पहिल्या वृत्त निवेदिका गीतांजली अय्यर यांचे बुधवारी (७ जून ) निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्या दीर्घकाळाने मेंदूशी संबंधित विकाराने पीडित होत्या. अशातच बुधवारी सकाळी त्यांचे राहत्या घरी निधन झाले. गीतांजली अय्यर यांनी ३० वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर वृत्त निवेदन केले. इंग्रजी भाषेत वृत्त निवेदन करणाऱ्या गीतांजली अय्यर या दूरदर्शनच्या पहिल्या वृत्त निवेदिका होत्या. त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट निवेदकाचा (ANCHOR ) पुरस्कार मिळाला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version