कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला मित्रराष्ट्राची साथ

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला मित्रराष्ट्राची साथ

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसलेला असून दैनंदिन रुग्णसंख्या तीन लाखांच्या पुढे गेली असताना युरोपिअन युनिअन, जर्मनी, फ्रान्, इंग्लंड तसंच अनके देश मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. यानंतर अमेरिकेनेही भारताला मदत करण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेने कोव्हिशिल्ड लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल पुरवण्याची ग्वाही दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यात फोनवरुन चर्चा झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही देशांमधील स्थितीवर चर्चा झाल्याची माहिती दिली आहे. तसंच मदतीचं आश्वासन दिल्याबद्दल आपण जो बायडन यांचे आभार मानल्याचं मोदी यांनी सांगितलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी कोरोनाशी लढण्यासाठी भारताला आणि भारतीयांना वैद्यकीय साहित्यासोबतच सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. जो बायडन यांनी सोमवारी ट्विट करत, ‘ज्याप्रमाणे भारताने अमेरिकेला करोनाच्या सुरुवातीच्या काळात सर्व रुग्णालयांमध्ये भीषण स्थिती असताना मदत केली त्याचप्रमाणे आम्ही भारताला गरज असताना मदत करण्याचं ठरवलं आहे’, असं म्हटलं आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version