बँकेत नोकरी (jobs in Bank) करायचं स्वप्न असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ मध्ये (SBI) तब्बल 8 हजार जागांसाठी भरती (job recruitment) होणार आहे. क्लर्क (clerk) पदांसाठी या जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया शुक्रवार पासून सुरू झाली आहे.
26 जानेवारी 2020 ही ऑनलाईन अर्ज (Online application) भरण्याची शेवटची तारीख आहे.
कस्टमर सपोर्ट आणि सेल्स (Customer Support) विभाग – कनिष्ट सहाय्यक पदांसाठी भरती होणार आहे.
पात्र उमेदवारांना https://www.sbi.co.in/carriers या वेबसाइटवर ऑनलाईन नोंदणी (online registration) करता येईल. एका उमेदवाराला एकाच राज्यात अर्ज करता येईल.
महाराष्ट्र – 865
उत्तर प्रदेश – 865
मध्य प्रदेश – 510
छत्तीसगढ – 90
दिल्ली – 145
राजस्थान – 500
बिहार – 230
झारखंड – 45
अर्जदाराचे वय 20 ते 28 असावे.
2 जानेवारी 1992च्या आधी आणि 1 जानेवारी 2000 नंतर जन्मलेल्यांना अर्ज करता येणार नाही.
भरतीची प्राथमिक परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2020 दरम्यान होणार आहे.
प्राथमिक परीक्षेतून निवडलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा 19 एप्रिल 2020 ला होईल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.