दुसऱ्यांच्या घरात डोकावून बघायचं ही विकृती आहे. त्यामुळे फोन टॅपिंगची चौकशी व्हायलाच पाहिजे, असा आरोप गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. तसंच भीमा-कोरेगाव प्रकरणीही त्यांनी माजी सरकारवर आरोप केले आहेत.
दुसऱ्यांच्या खासगी आयुष्यात डोकवण्याची गरज काय ? ही विकृती असून याची चौकशी व्हायला हवी, असं आव्हाड यांनी म्हटलंय.
“कार्यकर्ता या नात्याने मी मागेच म्हटलं होतं की भीमा कोरेगाव प्रकरणी चुकीचे आरोप झाले. नामदेव ढसाळ यांची कविता म्हटल्याने जर कोणाला अटक होत असेल तर, त्या कवितेवर केंद्र सरकारने बंदी घालावी.” असं आव्हान त्यांनी केलं.
शिवसेना मागच्या काळात फक्त मंत्रिमंडळात बसण्यापुरती होती, बाकी त्यांच्या हातात काही नव्हतं, असंही आव्हाड यांनी म्हटलंय.
शरद पवार यांच्या सुरक्षेविषयी काय म्हणाले आव्हाड?
पवार साहेबांची सुरक्षा काढली यावर घाबरणारे पवार साहेब नाहीत.
1993 साली गोपीनाथ मुंडे यांनी जेव्हा पवार यांच्यावर आरोप केले होते तेव्हा पवारांपेक्षा जास्त सुरक्षा त्यांनी गोपीनाथ मुंडे यांना दिली होती.
आजही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांएवढी सुरक्षा आहे. आम्ही ती कमी नाही केली, जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.