जालना जिल्ह्यातील एका मुलीवर मुंबईतील चेंबुर परिसरात राहणाऱ्या चार जणांनी मिळून सामूहिक बालत्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या मुलीवर महिनाभरापासून उपचार सुरू होता. मात्र गुरुवारी या मुलीचा दुर्दैवी अंत झाला. सरकार व पोलीस प्रशासन या घटने कडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाकडून केला असून निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने चेंबुर लाल डोंगर ते चुनाभट्टी पोलिस स्थानकापर्यंत मोर्चा काढला.
नेमकं प्रकरण काय ?
जालना जिल्ह्यातील घनसांवगी तालुक्यातील एका गावात पीडित मुलगी राहत होती.
चेंबुर येथे पीडितेचा भाऊ राहत असून त्याच्या मुलाची तब्येत बरी नसल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
भावाच्या मुलाला सांभाळण्यासाठी पीडित मुलगी मुंबईत आली होती.
मात्र भावाच्या मुलाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलीला गुंगीचे औषध देऊन चार जणांनी मिळून बलात्कार केल्याचे समजते आहे.
मात्र घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे मुलीने कुटुंबियांना याबद्दल सांगितले नाही.
दोन दिवसांनतर मुलीची अवस्था बिकट झाल्यानंतर कुटुंबियांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले.
पायात जोर नसल्यामुळे पॅरालिसिस झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टारांनी पॅरालिसिस झाले नसून सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले.
तसेच तिची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टारांनी सांगितले.
त्यानंतर मुलीला विचारल्यावर आपल्यावर चार जणांनी गुंगीचे औषध पाजून बलात्कार केल्याचे म्हटलं.
याबाबत मुंबईतील चुनाभट्टी पोलीस अधिक तपास करत आहेत.
जो प्रयत्न आरोपींना पोलीस अटक करत नाहीत तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे पीडित मुलीच्या आई-वडिलांनी सांगितले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.