जैस्वाल यांनी फोडलाय मविआतल्या टक्केवारीचा बॉम्ब

जैस्वाल यांनी फोडलाय मविआतल्या टक्केवारीचा बॉम्ब

मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यानंतरच आमदारांना निधी दिला जातो, असा गंभीर आरोप शिवसेना आमदार आशिष जैस्वाल यांनी केला आहे. याबाबत ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही बोलले होते. दरम्यान, सोमवारी आशिष जैस्वाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शासकीय निवासस्थानी भेट घेतली आहे.

आशिष जैस्वाल म्हणाले, ‘मतदार संघाला न्याय मिळाला हवा. निधीचा समतोल आम्ही कधीही सहन करणार नाही. मंत्र्यांना आर्थिक मोबदला दिल्यावरच निधी दिला जातो. आमच्यासाठी आधी मतदारसंघ, मग पार्टी आणि नंतर महाविकास आघाडी महत्त्वाची आहे. पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या आमदारांनाही आधी मतदारसंघ मह्त्तवाचा आहे हे लक्षात ठेवावे.’ असे जैस्वाल म्हणाले.

आशिष जैस्वाल यांनी मविआतील टक्केवारीचा बॉम्ब फोडल्यानंतर जैस्वाल यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, याप्रकरणी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आशिष जैस्वाल हे शिवसेनेचे आहेत. आणि ते नाराज नाहीत, असा दावा राऊतांनी केला आहे. तसेच ‘जर कुणी मंत्री टक्केवारी मागत असेल तर त्याचा खुलासा जैस्वाल यांनी करावा, तसेच विधानसभेत याप्रकरणी प्रश्न उपस्थित करावा’ अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version