जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात सर्व 48 आरोपी दोषी

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात सर्व 48 आरोपी दोषी

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात 48 आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. सुरेश जैन, गुलाबराव देवकर यांसारख्या बड्या नावांसह एकूण 48 जणांना ताब्यात घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

घरकुल घोटाळा

घरकुल योजना ही झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी असलेली जळगाव नगरपालिकेची योजना होती.

या लोकांना स्वस्तात चांगली घरं मिळावी, या हेतून त्यावेळी नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी झोपडपट्टी निर्मूलनासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

1999मध्ये हरी विठ्ठलनगर, समतानगर, खंडेरावनगर, तांबापुरा या ठिकाणी 110 कोटींचं कर्ज काढून 11000 घरांचं बांधकाम सुरू झालं.

पण 2001 मध्ये या योजनेतला घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं.

सत्ताधाऱ्यांनी आपल्या मर्जीतल्या बिल्डर्सना हे काम दिलं असल्याचं समोर आलं. ठेकेदारांनाही 29 कोटी रुपये देताना घोटाळा करण्यात आला होता.

टेंडरमधील मर्यादा पाळण्यात आल्या नव्हत्या.

नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झाल्यावर यातील घोळ उघडकीस आले. त्यात 48 लोक संशयित होते. कोर्टाने सर्व 48 जणांना दोषी ठरवलंय. या घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांची नावं आहेत.

  1. सुरेशदादा जैन, शिवसेना नेते
  2. गुलाबराव देवकर, माजी परिवहन मंत्री
  3. जगन्नाथ वाणी,खांदेश बिल्डरचे मक्तेदार
  4. राजा मयूर, खांदेश बिल्डरचे संचालक
  5. प्रदीप रायसोनी, तत्कालीन नगराध्यक्ष
  6. पी डी काळे, तत्कालीन मुख्याधिकारी

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version