बुलढाणा, १ जुलै २०२३, प्रतिनिधी: बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड राजा जवळ समृद्धी महामार्गावर (१ जुलै) शनिवारी पहाटे अपघातात एकूण २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या घटनेने महाराष्ट्रावर शोकाकुळ पसरली आहे. दरम्यान आता या अपघातावरून अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे. तर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुलढाणा अपघातावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. हा अपघात नसून घात आहे. तसेच याला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघेही जबाबदार असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
दरम्यान या अपघातावर प्रतिक्रिया देतांना जलील म्हणाले की,
कोणताही एक्सप्रेस-वे किंवा सुपर एक्सप्रेस-वे तयार होतो त्यावेळी रोड सेफ्टीचे नियम असतात. त्यामुळे समृद्धी महामार्गबाबत रोड सेफ्टीचे क्लियरेंस मिळाले होते का?, या महामार्गावर नेहमीच अपघात का होतात?. मी फक्त याच अपघातबद्दल बोलत नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस गाडी चालवत आहे, त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री शिंदे बसले असल्याचे दाखवण्यात आले. या दोघांना फक्त काळजी याची वाटत होती की, आपली सत्ता गेल्यावर दुसरं कोणीतरी याचं उद्घाटन करेल. यासाठीच घाईघाईने या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले आणि त्याचेच हे परिणाम आहे. त्यामुळे याला मी अपघात म्हणत नाही. ही हत्या असून, या हत्यांना मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दोघे जबाबदार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.