‘पडळकरांना व्यवस्थित करायला वेळ लागणार नाही’

‘पडळकरांना व्यवस्थित करायला वेळ लागणार नाही’

राजकारणात सातत्याने टीकास्त्र सोडले जात असतात. त्यात आरोप-प्रत्यारोप हे सुरूच असतात. दरम्यान, ‘पडळकरांना व्यवस्थित करायला वेळ लागणार नाही’ असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते खासदार शरद पवार यांच्या बद्दल एकेरी उल्लेख करून सध्या प्रसिद्धी मिळवण्याचा जो घाट सुरू आहे त्या लोकांना संस्कार शिबिरात पाठवण्याची गरज असून भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना नीट करायला वेळ लागणार नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सूसंस्कृत पक्ष असल्यामुळे आम्ही शांत आहोत असं वक्तव्य नगर पारनेर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी केल आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना खा.शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केला होता त्यावर आमदार लंके यांनी उत्तर दिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version