‘आत्महत्या नाही तर हत्याच आहे’ – चंद्रकांत पाटील

‘आत्महत्या नाही तर हत्याच आहे’ – चंद्रकांत पाटील

  अहमदनगरमधील शेवगावयेथील परिवहन महामंडळाच्या चालकाने आगारात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आगारात उभ्या असलेल्या एसटीला चालक दिलीप काकडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्याने केलेही ही आत्महत्या नाही तर ही हत्याच आहे, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यसरकारवर केली आहे.

  अहमदनगरमधील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या, समस्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांकडून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येसोबत एसटी कर्मचारी आत्महत्या हे प्रकरण अधिकच भीषण आहे. हा आक्रोश सरकारच्या कानी जात नाही का? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी राज्यसरकारला केला आहे.

  प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपामध्ये एसटी चालक दिलीप काकडे हेसुद्धा सहभागी झाले होते. आज सकाळच्या सुमारास दिलीप काकडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र अद्याप काकडे यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version