भोयर ग्रामपंचायत सचिवाचा मनमानी कारभार,आमसभा झाली पोलीस बंदोबस्तात

भोयर ग्रामपंचायत सचिवाचा मनमानी कारभार,आमसभा झाली पोलीस बंदोबस्तात

यवतमाळ शहरालगत असलेल्या भोयर ग्राम पंचायतमधील सचिव मनमानी कारभार सुरू आहे. या ग्रामपंचायतीमध्ये पार पडलेली आमसभा सचिवांच्या हेकेखोर भूमिकेमुळे पोलीस बंदोबस्तात घ्यावी लागली. इतकंच नव्हे तर ग्रामपंचायतीतील अनेक योजनांत गैरव्यवहार असल्याने ग्रामस्थांनी थेट पालकमंत्री मदन येरवार यांना गाठून सचिव बदलून देण्याची मागणी केली.

शहरालगतच्या भोयर ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे.

सचिवांकडून आमसभा न घेता मनमानी निर्णय घेण्यात येत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

आमसभा वेळेवर घेण्यात येत नसून या संदर्भात विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

ठराव स्वत:च्या मनाने घेतले जात असून सभेला कोणालाही बोलवल्या जात नाही.

अशाप्रकारे शासनाच्या विविध योजनांबाबत कोणालाही माहिती देखील दिली जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

त्यामुळे या सचिवाला तातडीने बरखास्त करण्यात यावं, त्या ठिकाणी योग्यता असलेल्या सचिवांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत

यवतमाळ शहरालगत असलेल्या या भोयर ग्रामपंचायतीमध्ये औद्योगिक वसाहतीचा भाग येतो. या औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास 160 च्या वर मोठे आणि लघुउद्योग सुरू आहेत. या कंपन्यांकडून येणारा निधी मात्र गैरव्यवहारामध्येच जातोय. त्यामुळे ग्रामपंचायतीचा विकास होण्याऐवजी अधिकारी आणि सचिव यांचा विकास झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version