बीडमध्ये कायद्याचे राज्य आहे की नाही?

बीडमध्ये कायद्याचे राज्य आहे की नाही?

चार दिवसांपूर्वीच बीड जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. आज पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने बीड जिल्हा हादरला आहे. त्यामुळे बीडमध्ये कायद्याचे राज्य आहे की नाही?, असा सवाल उपस्थित होत आहे.

बीडच्या परळी तालुक्यात असणाऱ्या मिरवट गावांमध्ये, शेतात काम करत असणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेवर, २ नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी अवघ्या तीन तासातच आरोपींना अटक करत कारवाई केली आहे.

बीडमध्ये बलात्काराचे सत्र सुरू आहे. ४ दिवसांपूर्वीच बीडमध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यानंतर आज पुन्हा २२ वर्षीय विवाहितेवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे बीड पूर्णत: हादरले असून बीडमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे. तसेच बीडमध्ये कायद्याचे राज्य आहे की नाही? असा सवालही उपस्थित होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version