Iran-Israel-US War Effect on India : इराण-इस्रायल युद्धामुळे भारताच्या ‘या’ भागात परिस्थिती बिकट, 7 मार्चपर्यंत शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय

अखेर आता भारतानं खामेनेई यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. 
Iran-Israel-US War Effect on India : इराण-इस्रायल युद्धामुळे भारताच्या ‘या’ भागात परिस्थिती बिकट, 7 मार्चपर्यंत शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय

सध्या जगभरात इराण-इस्रायल-अमेरिका युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ले केले. यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता.भारताकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती, अखेर आता भारतानं खामेनेई यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. 

दरम्याने,  यांच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये उसळलेल्या संताप आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर चौथ्या दिवशीही प्रशासनाने कडक खबरदारीचे उपाय कायम ठेवले आहेत.

हेही वाचा – Aadhaar Card Update: UIDAI चे हे नवीन नियम माहीत आहेत का? आता आधार कार्डमध्ये नाव आणि जन्मतारीख येणार पण… 

 सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये तसेच विद्यापीठे किमान शनिवार 7 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. University of Kashmir आणि Central University of Kashmir यांसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांनीही सर्व वर्ग स्थगित केले असून नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

हेही वाचा – Delhi City Name Change: केरळ पाठोपाठ दिल्लीचे नाव बदलणार? खासदाराने थेट अमित शाहांना लिहिलं पत्र; काय सुचवलंय नवं नाव? 

सोमवारी संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयात एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात अमेरिकेचे आणि इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यावर हत्या प्रकरण दाखल करण्याची मागणी करण्यात आली. खामेनेई यांच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आणि निदर्शने पाहायला मिळाली. हजारो लोक श्रीनगरमधील ऐतिहासिक घंटाघर परिसरात जमले आणि या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त केला. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version